महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांच्या आस्थापनेवरील ‘गट-ड’ शिपाई पदांच्या २८४ जागांसाठी परीक्षा १ जुलै ते ८ जुलै २०२५ दरम्यान ऑनलाईन घेण्यात येणार आहे. उमेदवारांना परीक्षेची प्रवेशपत्र वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील. तसेच प्रवेशपत्र/ उमेदवारास त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर आणि मोबाइल नंबर वर आयबीपीएस मार्फ़त पाठविण्यात येणार आहे. तसेच सदर परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. तरीही जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात येत आहे.
सूचना:–

प्रवेशपत्र डाऊनलोड लिंक :–
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/oecla_jun25/login.php?appid=e8c7f67b0591881da8c366dc20b6601c
