‘महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान‘, अशी ज्या राज्याची ओळख करून दिली जाते असं हे देशाच्या नकाशावरील ठसठशीत दिसणारं राज्य. 1 मे हा दिवस या राज्यासाठी अतिशय खास, कारण हा दिवस आहे, महाराष्ट्र दिनाचा. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. 1960 मध्ये म्हणजेच 65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती.

कसा सुरु झाला महाराष्ट्र दिन?
दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र आपला स्थापना दिन मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो. दरवर्षी या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि काही काळानंतर, मुंबई प्रांत होता ज्यामध्ये सध्या गुजरात आणि महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशांचा समावेश होता. आताचे गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होते. ब्रिटीश राजवटीत जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात हे बॉम्बे स्टेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकाच राज्याचा भाग होते. पण काही काळातच मराठी आणि गुजराती भाषिकांनी स्वतंत्र राज्यांच्या मागणीचा जोर धरला.
जुलै १९५६ मध्ये मंजूर झालेल्या राज्य पुनर्रचना कायद्यानंतर, भाषिक आधारावर अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर भाषिक राज्यांसाठी दबाव वाढू लागला, गुजराती भाषिक लोकांना त्यांचे वेगळे राज्य हवे होते आणि मराठी भाषिक लोक महाराष्ट्र हवा होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे रूपांतर एका महत्त्वपूर्ण संघर्षात झाले. तेव्हा एक दुःखद घटना घडली. तेव्हा मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी शांततापूर्ण निदर्शनादरम्यान पोलिसांना दिसताच गोळीबार करण्याचे आदेश दिले.
त्यागानंतरही, चळवळ अखेर यशस्वी झाली आणि तत्कालीन नेहरू सरकारने 1960 च्या मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत ऐतिहासिक विभाजन केले, ज्या अंतर्गत 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरातची स्वतंत्र राज्ये म्हणून निर्मिती करण्यात आली. यामुळेच 1 मे रोजी महाराष्ट्र्र दिन साजरा केला जातो.
काय आहे कामगार दिनाचा इतिहास?
कामगार दिन हा कामगारांच्या हितासाठी झालेल्या एका चळवळीतून सुरुवात झालेला दिवस आहे. 19व्या शतकाच्या मध्यावर कामगारांच्या एका चळवळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या चळवळीतून कामगारांच्या मागण्या पहिल्यांदाच जगासमोर मांडण्यात आल्या. 21 एप्रिल 1856 रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांनी आपल्या मागण्या सांगितल्या. कामगाऱ्यांचे दिवसाचे कामाचे तास ठराविक असावेत, या मागणीसाठी आंदोलन झाली. 1990 ला कामगारांची ही चळवळ अखेरीस अनेक पर्यटनानंतर यशस्वी झाली. 1989 आधी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरीस परिषद घेण्यात आली. त्या परिषदेमध्ये 1 मे 1890 हा दिवस जागतिक एकता दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरलं. त्यानंतर 1891 मध्ये 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्याचं मान्यता देण्यात आली.
कामगार दिनाचा इतिहास : १ मे हा दिवस संपूर्ण जगात ‘कामगार दिन’ म्हणून साजरा होतो. त्याचा इतिहास १९ व्या शतकापासून सुरु होते. १८८६ साली कामगारांनी कामाच्या वेळेवरून आंदोलन केल्यावर या दिवसाची सुरुवात झाली. त्या काळात मजुरांना प्रत्येकी १५ तास काम करावं लागत होतं. १८८६ मध्ये शिकागोच्या मार्केटमध्ये दंगल झाली आणि यानंतर १५ तासांच्या कामाच्या शिफ्टमध्ये एका कामगारांचा मृत्यू झाला. या दिवशी लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर आले. यानंतर कामाचे तास ८ तास असावे आणि आठवड्यातून एक सुट्टी द्यावी, अशी मागणी या लोकांनी केली होती. या संपादरम्यान कामगार आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांसह अनेक कामगारांचा मृत्यू झाला. यानंतर १ मे १८८९ रोजी एक बैठक झाली आणि हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारतात ‘कामगार दिन‘ कधीपासून सुरू झाला? : १ मे १८८९ रोजी अमेरिकेनं ‘कामगार दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाच्या ३४ वर्षांनंतर भारतात ‘कामगार दिन’ साजरा करण्यास सुरुवात झाली. देशात ‘कामगार दिन’ सर्वप्रथम चेन्नई येथे १९२३ मध्ये सुरू झाला. श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानच्या अध्यक्षतेखाली ‘कामगार दिन’ साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशातील इतर अनेक कामगार संघटनांनीही हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. भारतात दरवर्षी १ मे रोजी ‘कामगार दिन’ साजरा केला जातो, या दिवशी अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी देखील दिली जाते. हा दिवस प्रत्येक कामगारासाठी महत्त्वाचा आहे.
