
लाडक्या बहिनींना मिळणार मोफत वॉशिंग मशीन?” – सत्य काय ? आणि फसवणूक झाल्यास काय करावं.?
🛡️ कसं टाळाल अशी फसवणूक?
“लाडक्या बहिनीना मिळणार मोफत वॉशिंग मशिन!” – सत्य काय आहे? सावध राहा!
सोशल मीडियावर फिरतोय एक व्हायरल मेसेज –
“लाडक्या बहिनींना मिळणार मोफत वॉशिंग मशिन… लगेच रजिस्टर करा!”
पण यामागे सत्य काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
❗ सत्य काय आहे?
हा एक प्रकारचा सायबर स्कॅम (Online Fraud) आहे. यामध्ये फसव्या वेबसाइट्स किंवा लिंकद्वारे तुमची व्यक्तिगत माहिती, बँक डिटेल्स, किंवा OTP घेण्याचा प्रयत्न केला जातो.
- यामागे लपलेला धोका:
- फेक वेबसाईट्स:
ज्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायला सांगितलं जातं, त्या खऱ्या कंपन्यांच्या नसतात. त्या तुमचं नाव, मोबाईल, पत्ता घेऊन डेटा चोरी करतात. - फिशिंग स्कॅम:
OTP, आधार नंबर, किंवा बँक डिटेल्स मागून फसवणूक होण्याचा धोका वाढतो.
कोणतीही अधिकृत घोषणा नाही:
LG, Samsung, Whirlpool सारख्या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अशी एकही घोषणा सध्या नाही
- लाडकी बहीण योजना म्हणजे नेमकं काय?
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी असलेली सरकारी योजना आहे.
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत आर्थिक सहाय्य योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा उद्देश महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि स्वावलंबन वाढवणे हा आहे. या योजनेत कुठल्याही वस्तू जसे की वॉशिंग मशीन, मोबाईल फोन किंवा इतर वस्तू वाटपाचा समावेश नाही.
✅ आपली खबरदारी:
✔ अशा कोणत्याही मेसेजवर क्लिक करू नका
✔ अधिकृत वेबसाइट किंवा न्यूज चॅनल्सवर माहिती तपासा
✔ तुमची माहिती फक्त ओळखीच्या किंवा विश्वासार्ह वेबसाइट्सवरच द्या
- “मोफत” असं काही आढळल्यास त्याचा तपास करा – कारण खऱ्या प्रेमात गिफ्ट मिळतं, पण इंटरनेटवर “गिफ्ट” मागे काहीतरी गडबड असते
ü अशाप्रकारची फसवणूक कशी ओळखाल?
ऑफर खूपच चांगली वाटते (मोफत गिफ्ट, पैसे, स्कीम वगैरे)
लिंक ODD असते – उदा. xyz-freegift-random.in
लगेच शेअर करा / फॉर्म भरा असं सांगितलं जातं
अधिकृत वेबसाइट किंवा न्यूजमध्ये अशी बातमी नसत
❌ जर फसवणूक झाली असेल तर काय कराल?
✅ 1. तुमची बँक / UPI अॅपला लगेच संपर्क करा
– फोन करून ट्रान्झॅक्शन ब्लॉक करा
– ट्रान्झॅक्शन आयडी, स्क्रीनशॉट तयार ठेवा
✅ 2. सायबर क्राइमला तक्रार करा
📍 वेबसाईट: www.cybercrime.gov.in
📞 हेल्पलाइन: 1930 (9 AM – 6 PM)
✅ 3. पासवर्ड बदला
– Gmail, Insta, Bank App, इत्यादी सर्व पासवर्ड बदलून नवीन सुरू करा
✅ 4. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करा
“मोफत” म्हणणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका
OTP, CVV, आधार नंबर, पासवर्ड कोणालाही सांगू नका
फक्त अधिकृत वेबसाइट/Store वरूनच रजिस्ट्रेशन करा
“Forward करा – मग भेट मिळेल” असं सांगणारे मेसेज IGNORE करा
तुमचा डेटा, तुमचं पैसे, तुमचं सोशल अकाउंट – सर्वकाही मौल्यवान आहे!
तुमचा डेटा, तुमचं सुरक्षितताच खरी भेट आहे..
लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
https://ladakibahin.maharash
#MazhiNaukari #OnlineScam #CyberSafety #फसवणूक #सतर्कता
