सरळसेवा भरती 2025 आणि MPSC Group C Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी एकूण 938 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट -क भरती 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 938 पदांसाठी साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2025 (रात्री 23:59) निश्चित करण्यात आली आहे.

“सरळसेवा भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे…”
जाहिरात क्र.: 049/2024
पदाचे नाव & तपशील: पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | विभाग | पद संख्या |
| 1 | उद्योग निरीक्षक | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग | 09 |
| 2 | तांत्रिक सहायक | वित्त विभाग | 04 |
| 3 | कर सहायक | वित्त विभाग | 73 |
| 4 | लिपिक-टंकलेखक | मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये | 852 |
| Total | 938 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1 (उद्योग निरीक्षक): सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
- पद क्र.2 :(तांत्रिक सहायक) पदवीधर
- पद क्र.3 (कर सहायक): (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.4 (लिपिक-टंकलेखक): (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
टंकलेखन अर्हता :-
कर सहायक : मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
लिपिक-टंकलेखक : मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्गासाठी ₹394/- आहे. [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ यांच्यासाठी: ₹294/-, तर माजी सैनिकांसाठी फक्त: ₹44/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2025
- पूर्व परीक्षा: 04 जानेवारी 2026
“सरळसेवा भरती 2025 अर्ज कसा करावा?”

